मुंबई – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच आपल्या व्हिलनची भूमिकेमुळे चर्चेत असतो. आतापर्यंत त्याने केलेल्या खलनायकाच्या भूमिका चांगल्या गाजल्या आहे. यातच नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनेत्री कंगना राणावत निर्मिती करत असलेल्या ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
View this post on Instagram
सध्या या चित्रपटाची एका सीनची सोशलवर चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटाची या सीनमध्ये नवाजुद्दीन नवाजुद्दीन सिद्दीकी 20 वर्षांच्या अभिनेत्रीसोबत रोमँटिक सीन करताना दिसत आहे. या सीनच्या अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न सध्या सोशलर सर्च केला जात आहे.
View this post on Instagram
नवाजुद्दीनसोबत रोमँटीक सीन करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया सेन्सेशन अभिनेत्री अवनीत कोर आहे. या सीनवरून सोशलवर नेटकरी टीका करतांना दिसत आहे. यावर आता अभिनेत्री अवनीत कोरने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
ती म्हणते,’स्त्री आणि पुरूष कलाकारांच्या वयातील असलेल्या अंतरात मला काही हरकत नाही. रोमाँटीक सीन याआधी देखील अनेक वेळा शूट झाले आहेत..’
View this post on Instagram
दरम्यान, कंगना निर्मिती करत असलेल्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘मणिकर्णिका फिल्म्स’द्वारे केली जात आहे.