पुणे विद्यापीठातून घडणार वैमानिक

“बी.टेक. एव्हिएशन’ अभ्यासक्रमास व्यवस्थापन परिषदेची मान्यता
40 लाख रुपये अभ्यासक्रमाचे शुल्क

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे “बी.टेक. एव्हिएशन’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठात बारावीनंतरच्या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन वैमानिकाचे प्रशिक्षण घेणार आहेत. केवळ 20 विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे एम.टेक. एव्हिएशन अभ्यासक्रमानंतर आता आता विज्ञान शाखेतून “पीसीएम ग्रूप’ घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकतेच या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.

विद्यापीठाने अमेरिका, दक्षिण अफ्रिका आणि जर्मनी या देशातील एव्हिएशन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्थांबरोबर करार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करताना दीड वर्षे प्रत्यक्ष विमान उडविण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. तर अडीच वर्षे एव्हिएशन क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क

40 लाखांपेक्षा जास्त असून त्यात विमान उडविण्याच्या प्रशिक्षण शुल्काचा समावेश केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. यासाठी 51 जणांनी अर्ज केले होते. त्यातील 20 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून त्यांची मुलाखत घेऊन त्यातील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित केले जातील. देशात प्रथमच बारावीनंतर चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणाबरोबरच अभियांत्रिकी पदवी मिळणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.