पेट्रोल-डिझेल, सीएनजीनंतर आता विमानाचं इंधनही महागलं

मुंबई – एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना विमान इंधनाचाही भडका उडाला आहे. गेल्या महिनाभरात एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे (ATF) दर जवळपास 9.30 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. परिणामी विमान प्रवास आणखी महागण्याची शक्‍यता आहे.

जून महिन्यात विमानाच्या इंधनाचा दर 62,279 रुपये किलोलीटर इतका होता. जुलै महिन्यातील 15 तारखेपर्यंत हा दर 68064 रुपये किलोलीटर इतका झाला. जानेवारी महिन्यात इंधनाचा दर 49084 रुपये किलोलीटर इतका होता.

या इंधन दरवाढीमुळे आता विमानाच्या प्रत्येक फेरीच्या खर्चात वाढ होणार आहे. भारतात एव्हीएशन टर्नाईम फुएलचे दर वाढल्यास ते परदेशातून आयात केले जाते. मात्र, सध्या कोरोना निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद असल्यामुळे हा पर्यायही आपसूकच बंद झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार किंवा विमान कंपन्यांकडून तिकीटांच्या दरात वाढ केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्याच आठवड्यात मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली होती. हानगर गॅसकडून सीएनजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपये 58 पैसे आणि घरगुती गॅसच्या दरात प्रतियुनिट 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅसच्या एक किलो सीएनजीसाठी आता 51.98 रुपये मोजावे लागतील. तर पाईप गॅसच्या स्लॅब 1 साठी 30.40 रुपये प्रतियुनिट आणि स्लॅब 2 साठी 36 रुपये प्रतियुनिट इतकी किंमत असेल.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी हे इंधन स्वस्त आहे. मुंबईत सध्या एका लीटर पेट्रोलसाठी 107.20 रुपये आणि डिझेलसाठी 97.29 रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 67 टक्के तर डिझेलच्या तुलनेत 47 टक्के स्वस्त आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.