पावसाची सरासरी वाढूनही पाणीसाठा कमीच

नगर  – पावसाचा मुक्काम वाढल्याने आणि जिल्ह्यात पूर्वी पेक्षा जास्त पर्जन्यमान होवूनही लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा न साठल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. जिल्ह्यात एकूण 48 लघुपाटबंधारे तलाव असून त्यापैकी 12 तलाव सध्या निरंक असून उर्वरित तलाव तलावातही 5 ते 100 टक्‍क्‍यांपर्यंत पाणी साठा जमा झाला आहे. 100 टक्के पाणी साठा असलेला एकमेव तलाव नारायण डोह मधील मेहेकरी तलाव असून उर्वरित तलावामध्ये 5 टक्‍क्‍यांपासून पाणी साठा साठल्याने आगामी चार पाच महिन्यांच्या कालावधीत पाणी टंचाई जाणवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील तीन मोठे आणि दोन मध्यमप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मात्र 48 लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी 12 तलावांनी तऴ गाठला असून 50 कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यात कमी अधिक प्रमाणात पाणी साठत असल्याने तेवढीच काय ती जमेची बाजू म्हणता येईल. किमान पिकांसाठी पहिले रोटेशन तरी लांबविण्यात यश येण्यासारखी परीस्थिती सध्या दृष्टीपथात येत आहे. त्यामुळे यंदाही टॅंकरमुक्तीची शक्‍यता कमीच असल्याचे जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्यातील 4र्8 लघुपाटबंधाते तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता 105.953 दलघमी इतकी आहे. त्यापैकी सध्याचा पाणी साठा 83.90 दलघमी इतका असल्याने हा पाणी साठी देखील 80 टक्‍क्‍याच्या घरात आहे.

त्यातही कोतुळ आणि पिंपळगाव खांड हे दोन्ही प्रकल्प लघुपाटबंधात्यांच्या तलावात बुडीत क्षेत्रात गेल्याने त्यांचा पाणी साठा निरंक दाखविण्यात आला आहे. एकूण ऑक्‍टोबर अखेरीस लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी साठा 80 टक्‍क्‍यांच्या घरात आहे तर कोल्हापूर टाइप बंशाऱ्यातही उपयुक्त पाणी साठा 58.142दलघमी इतका असून सध्या 39.31 इतका पाणी साठा साठले आहे. त्यामुळे आता वेधशाळेने अंदाज वर्तविल्या प्रमाणे होणाऱ्या पर्जन्य वृष्टीवरच पाणी साठवण क्षमतेत पूरण क्षमतेने पाणी साठविण्याची भिस्त आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.