‘अॅव्हेंजर्स’साठी तिकीट खिडकीवर ‘वॉर’

बहुतांश चित्रपटगृह “हाऊसफुल्ल’ : तिकिटांचे दर 3 हजार रुपयांपर्यंत

पुणे – “अॅव्हेंजर्स:एन्डगेम’ या हॉलिवूडपटाने युवा वर्गासह सर्वांनाच भूरळ घातली आहे. दि.26 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे तिकीट प्रेक्षकावर अक्षरश: प्रेक्षक तुटून पडले आहेत. प्रदर्शनापासूनच बुकिंगसाठी सिनेरसिकांच्या उड्या पडत असताना दि.1 मे रोजी आलेल्या सुट्टीमुळे देखील “अॅव्हेंजर्स : एन्डगेम’चे तिकीट मिळणेही अवघड आहे.

“मार्वेल सिनेमॅटीक युनिवर्स’च्या चित्रपटांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांचे जवळपास सगळेच चित्रपट भारतामध्ये “हाऊसफुल्ल’ असतात. या चित्रपटाचा आधीचा भाग म्हणजेच “अॅव्हेंजर्स : द इन्फिनिटी वॉर’ ने भारतात सुमारे 225 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला होता. भारतात कमी दिवसांमध्ये इतकी मोठी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला होता. नुकताच प्रदर्शित झालेला “अॅव्हेंजर्स एन्डगेम’ देखील याला अपवाद नाही. शहरात दिवसाला साधारण 10 कोटींचा गल्ला हा चित्रपट जमा करत आहे.

“अॅव्हेंजर्स : एन्डगेम’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 24 तासांच्या आत बहुतांश चित्रपटगृह “हाऊसफुल्ल’ झाली होती. या चित्रपटाच्या एका शोचे तिकीट कमीत कमी 250 रूपये आहे. तर जास्तीत जास्त दोन ते तीन हजारांच्या घरात पोहोचले आहे. तिकिटाचे दर जास्त असून सुद्धा हा प्रेक्षकांची गर्दी कायम आहे.

केवळ चित्रपटगृहांच्या बाहेरच नव्हे तर सोशल मीडीयावर “अॅव्हेंजर्स’ने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंतच्या तीन मालिकांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पहिला मालिका 2012 मध्ये प्रदर्शित झाली होती. या “सिनेमॅटीक युनिव्हर्स’ मधील 21 चित्रपटांच्या मालिकेनंतरचा हा शेवटचा चित्रपट असून “मार्व्हल्स फॅन्स’ खास “अॅव्हेंजर्स : एन्डगेम’ पाहण्यासाठी वेळ राखून ठेवत आहेत.

शहरातील साधारण 100 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपटाचे खास रात्री आणि सकाळी सहा-सातच्या सुमारास लावण्यात आलेले शो “तुफान’ सुरू आहेत. एकूणच या चित्रपटाला पुणेकरांचा “सुपर’ प्रतिसाद असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

रसिकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. “अॅव्हेंजर्स’ने अनेक सुपरहिट चित्रपटांना मागे टाकले आहे. अशीच परिस्थिती देशभरात आहे. रात्री “फॅमिली ऑडियन्स’ आणि सकाळी लवकरच्या “शो’ला तरूण वर्गाची गर्दी आहे.
– प्रकाश चाफळकर, सिटीप्राईड


‘अॅव्हेंजर्स:एन्डगेम’ पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या आणि “मार्व्हल्स’च्या चाहत्यांना हा चित्रपट पाहणे “मेजवानी’ आहे. सुपरहिरो प्रेमींना हा चित्रपट नक्कीच “पर्वणी’ आहे. “थ्रीडी’ इफेक्‍टमुळे खूपच चांगला “फील’ येत आहे.
– महेश आकोलकर, प्रेक्षक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.