मुंबईत तब्ब्ल एका तिकीटाची किंमत 2400 रुपये
अॅव्हेंजर्स सिरीजचा शेवटचा भाग असणारा ‘अॅव्हेंजर्सएन्डगेम’ हा प्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा आज (26 तारखेला) सर्वत्र प्रदर्शित झाल आहे. सुपरहिरोंसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीयांच्या मनात एक वेगळेच घर निर्माण केले आहे. त्यामुळे भारतात पहिल्याच दिवशी सिनेमाने जोरदार कमाई केली आहे.
या सिनेमाने पहिल्याच दिवशी जगभरात 1200 कोटींची कमाई केली असून, या कमाईत केवळ चायनाचा वाटा सर्वाधिक आहे. एण्डगेमसाठी मोठं मार्केट ठरलेल्या चायनासोबतच साऊथ कोरियामध्ये 8.4 मिलियन डॉलर्स, ऑस्ट्रेलियामध्ये 7 मिलियन डॉलर्स, फ्रान्समध्ये 6 मिलियन डॉलर्स, इटलीत 5.8 मिलियन डॉलर्स, तर जर्मनीमध्ये 5.6 मिलियन डॉलर्स इतकी कमाई झाली आहे. ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा आतापर्यंतचा हा 22 वा सिनेमा आहे.