मुंबई – साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जी ऐकून त्यांच्या आनंदाचा पारावार उरणार नाही. ‘अवतार 2’ सोबत ‘पुष्पा 2’ची झलक चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार असल्याची बातमी आहे.
लोक अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द रुल’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाने लोकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली होती. साऊथसोबतच या चित्रपटाचे हिंदी व्हर्जनही लोकांना आवडले. हे पाहता ‘पुष्पा 2’ शी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाहत्यांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची झलक लवकरच पाहायला मिळू शकते.
पुष्पाने अल्लू अर्जुनला रातोरात भारतातील स्टार बनवले. त्याच्या धमाकेदार कमाईनंतर, सोशल मीडियावर काही काळ चर्चा आहे की चित्रपटाचे निर्माते ‘पुष्पा 2’ साठी एका खास योजनेवर काम करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या ‘अवतार 2’ चित्रपटासोबत ‘पुष्पा 2’ चा फर्स्ट लूक व्हिडिओ जोडण्याची योजना आखली जात आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अल्लू अर्जुन पुष्पाचा दमदार अवतार पाहण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
‘अवतार 2’ पुढील महिन्यात 16 डिसेंबरला रिलीज होत आहे, तर 17 डिसेंबरला ‘पुष्पा: द राइज’ रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण होईल. पण, यावेळी पुष्पा 2 चा टीझर अवतार घेऊन लॉन्च होणार आहे. ट्रेड एक्सपर्टच्या मते, ‘अवतार 2’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचणाऱ्या प्रेक्षकांना ‘पुष्पा 2’ची झलकही पाहायला मिळेल.