शिरूर – पुण्याच्या ग्रामीण भागात वाहन विक्री आणि उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने, “पुण्याची ओळख’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दै. प्रभातच्या वतीने “ऑटो झोन-2019′ या कार्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी महिंद्रा कंपीच्या वतीने महिंद्रा ‘एसयूव्ही’ (स्पोर्ट्स) आणि ‘मराजो’ हे दोन वाहन सादर केले. अलीकडच्या काळात एसयूव्ही मोटारीसाठी भारतीय बाजारपेठ पोषक बनली आहे.
रस्ते कामातील सुधारणा, नव्या पिढीची मागणी आणि भारतीयांचे वाढते उत्पन्न या आधारावर एसयूव्ही मोटारींचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळे एसयूव्हीसारख्या गाड्यांचा बाजार हा येत्या दोन-तीन वर्षात 50 लाखांपर्यंत जाईल, असे चित्र आहे.
रस्त्याचे रुंदीकरण, एक्स्प्रेस वे, वेगाने चालवण्याचे वेड, परदेशातील गाड्यांचे आकर्षण, किमतीतील लवचिकता या कारणांमुळे एसयूव्ही गाड्यांना पसंती दिली जात आहे. याशिवाय दणकट आणि आकर्षकता या दोन्ही बाजूही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.