#Autozone2019 बी. यु. भंडारी तर्फे एमजी हेक्टर सादर

दै. प्रभातच्या वतीने आयोजित केलेल्या ऑटो झोन २०१९ मध्ये, बी. यु. भंडारी तर्फे एमजी हेक्टर हि कार सादर करण्यात आली आहे. कंपनीने ही गाडी १४ लाख रुपयांत लॉन्च केली आहे. ही कार पेट्रोल, पेट्रोल मिल्ड हायब्रिड, डिझेल इंजिन व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीत मॅन्युअल ट्रान्समिशन, डीसीटी ऑटोमेटिक गिअरबॉक्सचे पर्याय देण्यात आले आहेत.

एमजी हेक्टरचे चे चार व्हेरिएंट आहेत त्यामध्ये स्टाइल, सुपर, स्मार्ट आणि शार्प या व्हेरिएंटचा समावेश आहे. टॉप ट्रिम म्हणजेच शार्प व्हेरिएंटमध्ये एलईडी हेडलॅम्प, डीआरएल, ड्युअल टोन अॅलॉय व्हील, 10.4 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉईड अॅपल स्मार्टफोन कॉम्पेटिबिल्टी, आय स्मार्ट कनेक्टिविटी सूट, लेदर सीट कवर, पॅनोरेमिक सनरूफ, पावर्ड ड्राइव आणि त्यासोबतच इतरही अनेक फीचर्सचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.