#Autozone2019 : टाटा मोटर्सच्या वतीने ‘हॅरिअर’ आणि ‘नॅक्सोन’ सादर

शिरूर – पुण्याच्या ग्रामीण भागात वाहन विक्री आणि उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने, “पुण्याची ओळख’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दै. प्रभातच्या वतीने “ऑटो झोन-2019′ या कार्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळी टाटा मोटर्सच्या वतीने ‘हॅरिअर’ आणि ‘नॅक्सोन’ हे दोन वाहन सादर करण्यात आले. टाटा हॅरिअर मॉडेल 12.69 लाख रुपयांपासून सुरू होते. तर एक्‍सझेड मॉडेल 16.25 लाख रुपयांत पडते. टाटा हॅरिअर चार प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

त्याशिवाय टाटा हॅरिअर इम्पॅक्‍ट 2.0 डिझाईन फिलॉसॉफीनुसार विकसित करण्यात आले आहे. 2018 च्या ऑटो एक्‍स्पोमध्ये टाटा समूहाने एच 5 एक्‍स ही संकल्पना प्रदर्शित केली होती. यातील बरीच वैशिष्ट्ये टाटा हॅरिअरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून येते. या प्रकारातील गाड्यांमध्ये टाटा हॅरिअर सर्वात मोठी आहे. त्याचबरोबर हिचा फूटप्रिंट स्पर्धकांपेक्षा जास्त आहे.

तर, टाटा ‘नेक्‍सॉन’ आवृत्ती सादर करण्यात आली आहे. यामधील वैशिष्ट्य जवळपास सारखेच आहे.  यामध्ये नेक्‍सॉन एक्‍सई, एक्‍सएम, एक्‍सटी, एक्‍सटी+, एक्‍सझेड आणि एक्‍सझेड+ ही मॉडेल्स उपलब्ध करण्यात आली आहेत. यामधील काही मॉडेलमध्ये ड्यूअल टोन रुफ असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.