शिरूरमध्ये भव्य वाहन मेळाव्याची उत्स्फूर्त सांगता

‘दैनिक प्रभात’ तर्फे आयोजन : दुचाकी, चारचाकी गाड्यांची रॅली, गाड्यांच्या प्रात्यक्षिकांचा थरार

शिरूर – येथे “दैनिक प्रभात’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर भव्य वाहन मेळाव्यात (ऑटो झोन) रविवारी (दि.24) शिरूर शहरातून मेळाव्यासाठी आलेल्या दुचाकी ते चारचाकी सर्वच गाड्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. रॅलीत झेंडे घेऊन सहभागी झालेल्या नामांकित कंपन्यांच्या चारचाकी, दुचाकी गाड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

रॅली संपल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर काही नामांकित गाड्यांच्या थर्टी सिक्‍स राईट, त्यातील राइट ऍण्ड बॅकग्राऊंडची प्रात्यक्षिक करण्यात आली. टीव्हीवर वाहनांच्या जाहिरातीमध्ये गाड्यांनी उडवलेला धुरळा आणि गाड्यांच्या स्पीडचा थरार नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

“दैनिक प्रभात’च्या वतीने आयोजित न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर वाहन मेळाव्याच्या (ऑटो झोन) तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने हजारो नागरिकांनी वाहन मेळाव्यास भेट दिली. ग्रामीण भागामध्ये प्रथमच अशा प्रकारच्या विविध कंपन्यांची चारचाकी व दुचाकी वाहने एकाच छताखाली नागरिकांना पाहावयास मिळाल्यामुळे नागरिकांनी “दैनिक प्रभात’चे आभार मानले. “प्रभात’च्या वतीने शिरूर तालुक्‍यात प्रथमच हा वाहन मेळावा भरवण्यात आला आहे. या वाहन मेळाव्यास नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

भव्य-दिव्य रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले

शिरूर तालुक्‍यामध्ये प्रथमच एकाच छताखाली 14 नामांकित कंपन्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहने एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खरेदीसाठी हा वाहन मेळावा ग्राहकांना पर्वणीचा ठरला आहे. वाहन मेळाव्यात महिंद्रा कंपनीची नव्यानेच आलेली जीतो प्लस कमर्शियल गाडीची लॉन्चिंग करण्यात आली. वाहन मेळाव्यात कमर्शियल आणि दररोज वापरण्यात येणारी वाहने, कार शालेय बसेस, मालवाहतूक टेम्पो, दुचाकी वाहने, हिरो कंपनीच्या विविध प्रकारची दुचाकी वाहने, रॉयल एनफिल्ड बुलेट, विविध प्रकारची दुचाकी, जीप कंपास, एमजी फॅक्‍टर, इनोव्हा फॉर्च्यूनर, वॉल्स वॅगन, नेक्‍सॉन, हरीहर, टाटा योद्धा, टाटा इंट्रा, फोर्ड इको स्पोर्ट, क्रेटा, सेंट्रो, बोलेरो महिंद्रा, महिंद्रा मॅरेजो, महिंद्रा एक्‍सएलव्ही, होंडा कंपनीची डब्ल्यूआरव्ही, बीआरव्ही आदी कंपन्यांची वाहने ‘प्रभात’ च्या वतीने एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली.

वाहन मेळाव्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी ग्राहकांनी अनेक वाहनांची चौकशी केली.
मेळाव्यात वाहन घेण्यासाठी आलेल्या खरेदीदारांची रेलचेल होती. वाहन मेळाव्यात विविध कंपन्यांच्या एक्‍झिक्‍यूटिव्ह यांनी समाधान व्यक्‍त केले. शिरूरसारख्या ग्रामीण भागांमध्ये वाहन मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्याबद्दल दैनिक प्रभातचे त्यांनी आभारही मानले.

दुचाकी, चारचाकी गाड्यांची शिस्तबद्ध रॅली – 
दैनिक प्रभातच्या वतीने भव्य वाहन मेळावा आयोजित केल्यानंतर शहरासह तालुक्‍यातील नागरिकांना खरेदीसाठी नवे दालन मिळाले आहे. “प्रभात’च्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वस्तरांतून स्वागत करण्यात आले. मेळाव्यानिमित्त शिरूर शहरातून वाहन मेळाव्यास आलेल्या नामांकित कंपन्यांच्या दुचाकी-चारचाकी गाड्यांची रॅली शहरातून काढण्यात आली. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली.
ही रॅली शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.