मुंबई – ऑगस्ट महिन्याची बहुतांश वाहन कंपन्यांची विक्रीची आकडेवारी जाहीर झाली असून कंपन्यांनी वितरकांना विकलेल्या वाहनांच्या संख्येत भरघोस वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
बऱ्याच राज्यांनी आता निर्बंध कमी केले आहेत. रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत होत आहे. यामुळे आतापर्यंत वाहन विक्री टाळलेले ग्राहक वाहनांची खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यानच्या काळामध्ये वाहन कंपन्यांनी बरीच नवी मॉडेल सुरू केली आहेत. त्याचाही वाहन विक्रीसठी लाभ होत असल्याचे दिसून येत आहे.
टाटा मोटर्सने आज जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यामध्ये या कंपनीची विक्री 53 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव आज तीन टक्क्यांनी वाढला. कंपनीने ऑगस्ट महिन्यामध्ये 54,190 वाहने विकली.
वाहनावर जास्त जीएसटी असल्याची खंत या क्षेत्रातील कंपन्यानी वेळोवेळी व्यक्त केली आहे. यावर विचार चालू असल्याचे काही मंत्र्यानी गेल्या पंधरवाड्यात सूचीत केले आहे. जर याबाबत सकारात्मक निर्णयाचे संकेत मिळले तर विक्री आणखी वाढेल असे वाहन उत्पादकांना वाटते.
कंपनी वाढलेली विक्री
बजाज ऑटो 5%
निसान मोटार 400 %
स्कोडा ऑटो 400 %
ह्युंदाई मोटर्स 12 %
अशोक लेलॅंड 48 %
मारुती सुझुकी 5 %
टाटा मोटर्स 53 %
महिंद्रा 17 %
टोयोटा किर्लोस्कर 200%
एमजी मोटर 51%
व्हीसी कमर्शियल 200%
किया इंडिया 55%
टीव्हीएस मोटार 1 %
होंडा कार्स 49%
होंडा टू व्हीलर्स 18%