#AUSvPAK : आता ऑस्ट्रेलियाचाही पाक दौऱ्यास नकार?

सिडनी – न्यूझीलंड व इंग्लंडपाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाचा संघही पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यास नकार देणार आहे. पाकिस्तान क्रिकेटला एकामागून एक धक्‍के बसत आहेत. पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये भीतीचे असे वातावरण आहे की, त्या देशात क्रिकेट खेळण्यास सर्व संघ स्पष्टपणे नकार देत आहेत.

तब्बल 18 वर्षांनंतर पाकमध्ये दाखल झालेल्या न्यूझीलंड संघाने सामना सुरू होण्यापूर्वीच मालिका स्थगित करत मायदेशी प्रयाण केले. त्यानंतर इंग्लंडनेही पाकमध्ये खेळण्यास नकार दिला.

इंग्लंडचे पुरुष आणि महिला संघ पुढील महिन्यात ऑक्‍टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार होते. न्यूझीलंड आणि इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाही त्यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत साशंकता दाखवत आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तानचा दौरा करणार असला तरी न्यूझीलंड आणि इंग्लंडनंतर त्यांनी पाकिस्तान दौऱ्याचाही पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे. ते पुढील वर्षी पाकिस्तान दौऱ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ऑस्ट्रेलियन संघाला पुढील वर्षी फेब्रुवारी व मार्चमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर संपूर्ण मालिका खेळायची आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.