#AUSvPAK 2nd Test : आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव ३ बाद ५८९ वर घोषित

अॅडलेड : डेव्हिड वाॅर्नरची नाबाद त्रिशतकी खेळी आणि मार्नस लबुशेनच्या दमदार दीडशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुस-या कसोटी सामन्याच्या पहिला डावात धावांचा डोंगर उभा केला आहे. आॅस्ट्रेलियाने पहिला डाव ३ बाद ५८९ वर घोषित केला.

आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. सलामीवीर जो बर्न्स केवळ ४ धावा करत माघारी परतला. त्याला शाहीन अफरीदीने मोहम्मद रिजवानकरवी झेलबाद केले.त्यानंतर लबुशेनच्या साथीने वाॅर्नरने संघाची धुरा संभाळात पाक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. दुस-या विकेटसाठी दोघांनी ३६१ धावांची दमदार भागीदारी केली. लबुशेन १६२ धावांवर खेळत असताना शाहीन अफरीदीने त्याला त्रिफळाचित केलं. लबुशेनने २३८ चेंडूत १६२ धावांच्या खेळीत २२ चौकार लगावले.

त्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि वाॅर्नर संघाचा डाव सावरला. वाॅर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं त्रिशतक झळकावलं. वाॅर्नरने ४१८ चेंडूत ३९ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३३५ धावा केल्या.

वाॅर्नरने तिस-या विकेटसाठी स्मिथसोबत १२१ आणि मॅथ्यूसोबत ९९ धावांची भागिदारी रचली. मॅथ्यू वेडने ४० चेडूंत ३८ धावा केल्या. अखेरीस आॅस्ट्रेलियाने ५८९ वर पहिला डाव घोषित केला. पाककडून शाहीन अफरीदी या एकमेव गोलंदाजानी ३ गडी बाद केले. अफरीदी वगळता अन्य गोलंदाजांना गडी बाद करण्यात अपयश आले.

स्मिथने मोडला ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम

सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने ७३ वर्षांपू्र्वीचा जुना विक्रम मोडला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम स्मिथने आपल्या नावे केला आहे.

स्टिव्ह स्मिथने ७० कसोटी सामन्यात १२६ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली. याआधी १९४६ साली इंग्लंडच्या वेली हॅमाँड यांनी १३१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.