वेलिंग्टन : विल समरविले याचा सिडनीमध्ये खेळण्याचा अनुभव पाहता न्यूझीलंडने त्याचा ऑस्ट्रोलियाविरूध्दच्या तिस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश केला आहे. ऑफ स्पिनर समरविले याने ऑस्ट्रोलियामध्ये शिक्षण पूर्ण केलं असून तो न्यू साउथ वेल्स क्रिकेट संघाकडून शैफील्ड शील्ड मध्ये खेळत आला आहे.
Off-spinner Will Somerville has been called up to the New Zealand Test squad as an injury replacement for Trent Boult ahead of the third and final Test of their series against Australia. pic.twitter.com/JNwLliX8HT
— ICC (@ICC) December 29, 2019
दरम्यान, मेलबर्न येथील दुस-या कसोटी सामन्या दरम्यान फलंदाजी करताना मिशेल स्टार्कचा बाऊन्सर ट्रेंट बोल्टच्या हातावर आदळल्याने त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले, त्यामुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा किमान चार आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे शुक्रवारी होणा-या सिडनी कसोटीत दुखापतग्रस्त ट्रेंट बोल्ट ऐवजी विल समरविले याचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंडला तीन सामन्याच्या मालिकेत २ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रोलियाने याआधीच ही मालिका २-० ने खिशात घातली आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघावर आता ‘व्हाईटवाॅश’चे संकट आहे. शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
न्यूझीलंड कोच गैरी स्टीड म्हणाले की, ” सिडनी येथील मैदानावरील खेळपट्टी ही फिरकीपटूसाठी अनुकूल मानली जाते. तसेच फिरकीपटू विल समरविले याने न्यू साउथ वेल्स संघाकडून अनेक सामने सिडनी मैदानावर खेळले आहेत ज्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा संघाच्या विजयासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.