#AUSvNZ : लबुशेनचे शानदार शतक; दिवसअखेर आॅस्ट्रेलिया ४ बाद २४८

पर्थ : मार्नस लबुशेनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत ४ बाद २४८ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात मार्नस लबूशेन याने कसोटी कारकिर्दीतील आपले तिसरे शतक झळकावलं.

आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपल्या सलामीवीरांना लवकर गमावले. डेविड वाॅर्नर ४३ आणि जो बर्न्स ९ धावांवर माघारी परतले. आॅस्ट्रेलियाची स्थिती २ बाद ७५ अशी असताना लबूशेनने स्टीव स्मिथच्या साथीनं डाव सावरत तिस-या विकेटसाठी १३२ धावा जोडल्या. स्टीव्ह स्मिथ ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैथ्यू वेड सुध्दा १२ धावांवर बाद झाला.त्यानंतर लबूशेन आणि ट्रैविस हेड यांनी सावध खेळ करत आणखी पडझड होऊ दिली नाही.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मार्नस लबुशेन ११० आणि ट्रैविस हेड २० धावांवर खेळत होता. न्यूझीलंडकडून नील वैगनरने ५२ धावा देत २ तर टिम साउदी आणि काॅलिन डी ग्रैंडहोमने प्रत्येकी १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.