मेलबर्न : कमिन्स आणि पॅटिन्सनच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मालिकेतील दुस-या कसोटीत पाहुण्या न्यूझीलंडला तिस-या दिवशी पहिल्या डावात अवघ्या १४८ धावांवर गुंडाळत ३१९ धांवाची मजबूत आघाडी घेतली आहे.
New Zealand scored just 104 runs today for the loss eight wickets. They fold on 148.
Australia have decided not to enforce the follow-on!#AUSvNZ SCORECARD: https://t.co/Svt1gqJqBv pic.twitter.com/kLqdCrZ4wc
— ICC (@ICC) December 28, 2019
कालच्या २ बाद ४४ धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडला आज ३६.५ षटकांत फक्त १०४ धावांची भर घालता आली आणि त्यांचा डाव १४८ वर आटोपला. सलामीवीर टाॅम लाथमने सर्वाधिक ५० धावा केल्या, त्याच्याशिवाय न्यूझीलंडचा एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही.आॅस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने २८ धावांत सर्वाधिक ५ तर जेम्स पॅटिन्सने ३४ धावांत ३ गडी बाद केले. मिचेल स्टार्कने ३० धावा देत २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ट्रॅविस हेडच्या ११४, स्टीव स्मिथच्या ८५, टिम पेनच्या ७९ आणि लबूशेनच्या ६३ धावांच्या जोरावर ४६७ धावा केल्या होत्या.