#AUSvNZ : आॅस्ट्रेलियाकडे ४१७ धावांची मजबूत आघाडी

पर्थ : आॅस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडविरूध्द पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडला पहिल्या डावात १६६ धावात गुंडाळत आॅस्ट्रेलियानं २५० धावांची आघाडी घेत पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर तिस-या दिवसअखेर आॅस्ट्रेलियाने दुस-या डावात ६ बाद १६७ अशी मजल मारली आहे.

कालच्या ५ बाद १०९ धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडने तिस-या दिवशी ५७ धावांची भर घातली. न्यूझीलंडची सहावी विकेट बीजे वाॅटलिंगच्या रूपात पडली. त्याला कमिन्सने ८ धावांवर त्रिफळाचित केल. त्यानंतर राॅस टेलरनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण नाथन लायनने स्मिथकरवी त्याला ८० धावांवर बाद केलं. त्यानंतर न्यूझीलंडचा एक ही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही. काॅलिन डी ग्रैंडहोम २३, मिशेल सैंटनर २ आणि टीम साउदी ८ धावांवर माघारी परतल्यान न्यूझीलंडचा डाव १६६ धावांवर आटोपला. आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने ५, नाथन लायनने २ तर हेझलवूड, पॅट कमिन्स आणि मार्नस लबुशेन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

त्यानंतर दुस-या डावात फलंदाजीसाठी आॅस्ट्रेलियाच्या संघाने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आॅस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली, सलामीवीर डेविड वाॅर्नरला टिम साउदीन १९ धावांवर बाद करत माघारी धाडल. तेव्हा त्याची १ बाद ४४ अशी धावसंख्या होती. त्यानंतर बर्न्स आणि लबुशेननं डाव सावरत दुस-या विकेटसाठी ८७ धावाची भागिदारी केली. मार्नस लबूशेन ५० धावांवर बाद झाला. त्यानंतर ठराविक धावाच्या अंतरावर आॅस्ट्रेलियाचे ४ फलंदाज बाद झाले. जो बर्न्स ५३, स्टीव स्मिथ १६, ट्रैविस हेड ०५ आणि टिम पेन शून्यावर बाद झाले. त्यामुळे तिस-या दिवसअखेर आॅस्ट्रेलियाची ६ बाद १६७ अशी अवस्था झाली असली तरी त्याच्याकडं ४१७ धावाची आघाडी झाली आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मैथ्यू ८ आणि पॅट कमिन्स १ धावावर खेळत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.