पर्थ : मार्नस लबुशेनच्या शतकी आणि ट्रैविस हेडच्या अर्धशतकीच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने पहिल्या डे-नाइट कसोटीत न्यूझीलंडविरूध्द सर्वबाद ४१६ धावा केल्या.
Australia are all out and it's time for Tea in Perth!
The hosts are bowled out for 416.
Marnus Labuschagne top scored with 143 whilst Neil Wagner and Tim Southee both took four wickets 👏
SCORECARD ➡️ https://t.co/JntjEL0JD8 pic.twitter.com/LPd43shLfG
— ICC (@ICC) December 13, 2019
कालच्या ४ बाद २४८ वरून पुढे खेळताना दुस-या दिवशी तिस-या सत्रापूर्वी आॅस्ट्रेलियाचा डाव ४१६ वर आटोपला. लबूशेनने कालच्या ११० धावावरून पुढे खेळताना आणखी ३३ धावा काढत १४३ वर आपली विकेट गमावली. संघाची धावसंख्या ३२५ असताना ट्रैविस हेड ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर टिम पेन ३९, पॅट कमिन्स २० मिशेल स्टार्क ३० आणि नाथन लायनने ८ धावा काढत संघाची धावसंख्या ४१६ पर्यंत नेली.
न्यूझीलंडकडून टिम साउदी आणि नील वैगनर यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. काॅलिन डी ग्रैंडहोम आणि जीत रावलने प्रत्येकी १ गडी बाद केला