सिडनी – न्यू साऊथ वेल्समधून येणाऱ्या दोन्ही संघांना क्विन्सलॅंड प्रशासनाने प्रवासाची परवानगी नाकारल्यास ब्रिस्बेनचा चौथा सामनाही सिडनीला खेळवावा लागेल. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील नव्या वर्षांतील उर्वरित दोन्ही सामने सिडनीत खेळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
सिडनीच्या काही भागांमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला या कसोटी सामन्यांचे आयोजन सिडनीतच करावे लागण्याची चिन्हे आहेत.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरीही न्यू साऊथ वेल्सकडील सीमा क्विन्सलॅंडसाठी बंदच राहिल्यास खेळाडू आणि प्रक्षेपण कर्मचाऱ्यांना चौथ्या कसोटीसाठी सिडनीहून ब्रिस्बेनला जाता येणार नाही.