#AUSvIND : पराभवानंतर नेटकऱ्यांची शास्त्रींवर टीका

झोप लागल्याचा जुना फोटो पोस्ट करत केले ट्रोल

सिडनी – भारताच्या सलग दोन पराभवांमुळे चाहते प्रचंड नाराज झाले असून त्यातील काहींनी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कार्यक्षमतेवरच टीका केली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका मालिकेतील सामना सुरू असताना शास्त्री यांना ड्रेसिंग रुममध्येच झोप लागली होती, हा फोटो त्यावेळी व्हायरलही झाला होता, तोच फोटो रिपोस्ट करत त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे.

असे ड्रेसिंग रुममध्येच झोपा काढणारे प्रशिक्षक असतील तर संघाची कामगिरी यापेक्षा वेगळी होणारच नाही. संघाचा सुमार खेळ होत असताना कोणत्याही नोंदी ठेवताना आजवर शास्त्रींना पाहिले गेले नाही. ते जर मुख्य प्रशिक्षक आहेत तर त्यांनी अशा नोंदी ठेवल्या पाहिजेत व संघाच्या बैठकीत खेळाडूंना त्याबाबत अवगत केले पाहिजे, असेही सोशल मीडियावर अनेकांनी सुचवले आहे.

संघ पराभूत होत असताना ते अनेकदा ड्रसिंग रुममध्ये झोपलेले दिसून आले आहेत. ते नक्की प्रशिक्षक आहेत ना, जर ते प्रशिक्षक असतील तर ते कधीच कोणत्याही नोंदी का ठेवत नाहित. खेळाडू कोणत्या क्षणी चुकले, त्यांनी पुढील सामन्यात या चुका कशा टाळाव्यात याबाबत तरी ते मार्गदर्शन करतात का, असाही सवाल त्यांना विचारण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.