मेलबर्न – भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याला मनगटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेला तसेच भारताच्या दौऱ्यावर येत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सचा चेंडू त्याच्या कोपरावर आदळला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही तो खेळू शकणार नाही. हातावरील प्लास्टर काढण्यात आल्यानंतर त्याला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.