#AUSvIND : कांगारुंना झटका, ‘हा’ खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं सुरूवातीचं दोन सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. याच दरम्यान, ऑस्ट्रेलियाला एका धक्का बसला आहे. संघाचा धडाखेबाज फलंदाज डेव्हिड वाॅर्नर हा दुखापतीमुळे शेवटच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही.

रविवारी झालेल्या सिडनी येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या दुसऱ्या डावादरम्यान वाॅर्नरला दुखापत झाली.  दुसऱ्या डावातील चौथ्या षटकांमध्ये शिखर धवननं मारलेला चेंडू रोखण्यासाठी वॉर्नर जात असताना त्याच्या डाव्या पायाला मोठी दुखापत झाली आणि  त्यामुळे त्याच्या मांडिचे स्नायू  दुखावले गेले.  मैदानात वॉर्नरला खूप वेदना होऊ लागल्याने त्याला त्वरित मैदान सोडावं लागले आणि त्यानंतर  लगेचच  त्याला एक्स-रे साठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

डार्सी शाॅर्टला मिळाली संधी….

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरोन फिंचने सामना संपल्यानंतर डेव्हिड वाॅर्नरच्या दुखापतीबदल माहिती दिली आहे. तसेच एकदिवसीय मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात 69 आणि 83 धावांची महत्वपूर्ण खेळी करणाऱ्या वाॅर्नरऐवजी आता टी-20 मालिकेत डार्सी शाॅर्ट या फलंदाजाला संघात जागा मिळाली आहे.

वॉर्नरपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसदेखील दुखापतग्रस्त असल्याने त्यालादेखील विश्रांती देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला सुध्दा विश्रांती देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियानं घेतला आहे. त्यामुळे शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आणि टी-20 मालिकेत कमिन्स खेळणार नाही. कसोटी मालिकेसाठी प्रमुख खेळाडू तंदुरस्त रहावेत, असा यामागे ऑस्ट्रेलिया संघाचा हेतू असावा. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.