वॉर्नर, अबॉट दुसऱ्या कसोटीलाही मुकणार?

मेलबर्न  – ऑस्ट्रेलियाचा अनुभवी डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व सिन अबॉट दुसऱ्या कसोटीलाही मुकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मांडीच्या स्नायूंच्या दुखापतींमुळे वॉर्नरला भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेला आणि कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीला मुकावे लागले.

दुसऱ्या कसोटीसाठी वॉर्नर तंदुरुस्त होईल, अशी आशा होती. परंतु मंगळवारी आलेल्या वृत्तनुसार वॉर्नर पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया त्याला याही कसोटीतून माघार घ्यावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.