चीनी विद्यार्थ्यांना विद्यापीठे सोडून जाण्याचा दिला इशारा
सिडनी: ऑस्ट्रेलियातील टॉप विद्यापीठांनी चिनी विद्यार्थ्यांना विद्यापीठे सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. करोना विषाणूमुळे घातलेल्या प्रवासबंदीची मर्यादा वाढवल्यानंतर विद्यापीठांनी हे पाऊल उचचले आहे.
ऑस्ट्रेलियातील आठ टॉप रॅंक विद्यापीठांमधील या विद्यार्थ्यांच्या विविध सेमिस्टर लवकरच सुरू होणार आहेत. चीनच्या सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतले होते. पण त्यांना देशात येण्यास 1 फेब्रुवारीपासून बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती या विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटाचे प्रमुख विकी थॉमसन यांनी दिली.
विकी थॉमसन म्हणाले, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ते येथे कधी येऊ शकतील, याबाबतचे कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी येथे विद्यार्थी येणारच नाही असे वाटत आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी जाहीर केले की प्रवास बंदी आणखी किमान एक आठवडा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, ब्रिटन, कॅनडामधील टॉप युनिव्हर्सिटी चीनी विद्यार्थ्यांना खुल्या आहेत. चीनी विद्यार्थ्यांची संख्या गेले काही वर्षांत जगभरच्या विद्यापीठांमध्ये वाढत आहे. 2017-18 साली विदेशी शिक्षणाचा वाटा या टॉप विद्यापीठांमध्ये 32.4 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतका होता. आता या विद्यार्थ्यांना लांब ठेवून ही टॉप विद्यापीठे या उत्पन्नातला 2 अब्ज डॉलर्सच्या शुल्कावर पाणी सोडत आहेत.