मेलबर्न : भारताचे मानांकित टेनिसपटू दिवीज शरण व अंकिता रैना यांना यंदाच्याही ऑस्ट्रेलियन स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला.
केवळ नशिबाच्या जोरावर या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेल्या भारताच्या खेळाडूंना यश मिळवताच आले नाही.
दिवीजचा पुरूष दुहेरीच्या गटात स्लोव्हाकियाच्या इगोर झेलेनीसह खेळताना जर्मनीच्या यान्नीक हान्फमॅन व केवीन क्रावेत्झ जोडीकडून 6-1, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला.
महिलांच्या दुहेरीत अंकिताला रुमानियाच्या मिहेला बुजरनेकुसह खेळताना ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हा गाडेची व बेलिंडा वुलक्लॉक यांच्याकडून 6-3, 6-0 असा पराभव पत्करावा लागला.