मेलबर्न : गतविजेती नाओमी ओसाका बुधवारी विजय मिळवून वर्षाच्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या स्पर्धेच्या तिसर्या फेरीत पोहचली आहे. ओसाकाने चीनच्या झेंग सईसाईचा 6-2, 6-4 ने पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
विजयानंतर ओसाका यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या “मला यूएस ओपनपासून खूप अनुभव मिळाला आहे. माझ्यासाठी ही एक नवीन स्पर्धा आहे.”