ऑस्ट्रेलियन खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधु व समीर यांची शानदार सलामी

सिडनी : ऑलिंपिकमध्ये रुपेरी यश मिळविणारी पी.व्ही.सिंधु व समीर वर्मा या भारतीय खेळाडुंनी ऑस्ट्रेलियन खुली बॅडमिंटन स्पर्धेत विजयी वाटचाल केली.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सिंधु हिने इंडोनेशियाच्या चोइरुनिसा हिचा 21-14, 21-9 असा पराभव केला. सहाव्या मानांकित समीर याने मलेशियाच्या ली झेइ जिया याच्यावर 21-15, 16-21, 21-12 अशी मात केली. भारताच्या बी.साइप्रणीत याने कोरियाच्या ली दोंग किउन याला 21-16, 21-14 असे हरविले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.