ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचा निर्णय निराशाजनक

दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथने व्यक्‍त केली नाराजी

जोहन्सबर्ग  – ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने करोनाच्या धोक्‍यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण, दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे क्रिकेट संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या दौऱ्यासाठी खूप तयारी केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याची तयारी आम्ही ठेवली होती. त्यांच्या निर्णयाने आम्ही निराश झालो आहोत, असे स्मिथने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळणार होता. गेल्या काही वर्षातील त्यांचा हा दक्षिण आफ्रिकेचा मोठा दौरा होता. या महिन्याच्या अखेरीस ही मालिका सुरू होणार होता. आम्ही केलेल्या सर्व तयारीवर पाणी फिरणार आहे, असेही स्मिथने म्हटले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सकाळी ई मेल द्वारे आम्ही हा दौरा रद्द करत असल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला कळवले. दक्षिण आफ्रिकेतील करोना संसर्गाची परिस्थिती चिंताजनक असून आम्हाला आमच्या खेळाडूंच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळेच आम्ही हा दौरा करत आहोत, असे कारण त्यांनी दिले होते. मात्र, तरीही आम्ही सर्व तयारी केली होती, असेही त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाकडून खुलासा

करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत असल्यामुळे केवळ खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला होता. तसेच त्यांना आम्ही आमच्या देशात येऊन मालिका खेळण्याचाही प्रस्ताव दिला होता, असा खुलासा ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.