#CWC2019 : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय

लंडन – विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाने येथील विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरी निश्‍चित केली आहे. त्यांच्यापाठोपाठ बाद फेरीसाठी उत्सुक असलेल्या न्यूझीलंडला आणखी एक गुणाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी त्यांना आज विजय मिळविणे अनिवार्य आहे. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीत अनेक वेळा कांगारूंचेच पारडे जड राहिले आहे.

विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या सामन्यास काही वेळातच लंडन येथील लॉर्डस मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंच याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

ऑस्ट्रेलिया –

ऐरन फ़िंच, डेविड वार्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, जेसन बेहरनडोर्फ़, नाथन लायन

न्यूझीलंड –

मार्टिन गप्टिल, हेनरी निकोल्स, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, ईश सोढ़ी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

Leave A Reply

Your email address will not be published.