जोहान्सबर्ग : फिरकीपटू एश्टन एगरच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १०७ धावांनी पराभव करत विजय संपादित केला. या विजयासह आॅस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. फलंदाजीत ९ चेंडूत २० धावा आणि गोलंदाजीत (हॅटट्रिकसह) ४ षटकात २४ धावा देत ५ विकेट घेणारा एश्टन एगर सामन्याचा मानकरी ठरला.
Ashton Agar, you beauty!
Our Aussies have made a flying start to the Qantas Tour of South Africa, with a 107-run win in the first T20 – and Agar taking a hat-trick! 🙌
Report/highlights 👉 https://t.co/xzryoaDuKg pic.twitter.com/7vuraaeGCc
— Cricket Australia (@CricketAus) February 21, 2020
आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या १९७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १४.३ षटकात ८९ धावसंख्येवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून फाफ डू प्लेसीने २४(२२), कगिसो रबाडाने २२(१९) आणि पेट्रस वैन बिलजाॅनने १६(१५) धावांची खेळी केली. या तीन फलंदाजांशिवाय इतर एकाही फलंदाजांला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
आॅस्ट्रेलियाकडून एश्टन एगरने ४ षटकात २४ धावा देत सर्वाधिक ५ गडी बाद केले. एडम जम्पा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी २ तर मिशेल स्टार्कने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारताना आॅस्ट्रेलियास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने फलंदाजी करताना स्टीव स्मिथच्या ४५(३२), अॅरन फिंचच्या ४२(२७), एलेक्स कैरीच्या २७(२२) आणि एश्टन एगरच्या नाबाद २०(९) धावांच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १९६ अशी मजल मारली होती.
दक्षिण आफ्रिकेकडून तबरेज़ शम्सी आणि डेल स्टेन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. लुंगी एनगिडी आणि एंडिल फेहुलकवायो यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.