मेलबर्न – एलिसा हिली, बेथ मूनी यांच्या खणखणीत अर्धशतकी खेळीनंतर मेगन स्कट आणि जेस जोनासेन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आयसीसी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारताचा 85 धावांनी पराभव करत विजय नोदंविला. यासह ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव उमटविले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014 आणि 2018 साली विश्वविजेतेपद पटकावले आहे. एलिसा हिली ही सामन्याची मानकरी ठरली तर बेथ मूनी हिला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
AUSTRALIA HAVE DEFENDED THEIR #T20WORLDCUP CROWN ? pic.twitter.com/dSeaN3srVR
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही. अवघ्या 58 धावांत भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. भारतीय संघाच्या शफाली वर्मा 2(3), जेमिमा राॅड्रिग्स 0(2), स्मृति मंधाना 11(8), हरमनप्रीत कौर 4(7) आणि वेदा कृष्णमूर्ति 19(24) या आघाडीच्या पाच फलंदाज झटपट बाद झाल्या. तर, रिचा घोष हिने 18(18) तर दीप्ति शर्माने सर्वाधिक 33(35) धावांची खेळी केली. त्यानंतर राधा यादव 1(2), शिखा पांडे 2(4) आणि पूनम यादव 1(5) धाव काढून बाद झाल्यानंतर 19.1 षटकांत 99 धावसंख्येवर भारताचा धाव संपुष्टात आला आणि भारताला 85 धावांनी पराभव पत्करावा लागला.
Final. It’s all over! Australia Women win by 85 runs https://t.co/oNy9gqjItM #IndvAus #T20WorldCup #TeamIndia
— BCCI Women (@BCCIWomen) March 8, 2020
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मेगन स्कटने 3.1 षटकांत 18 धावा देत सर्वाधिक 4 तर जेस जोनासेन हिने 4 षटकांत 20 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, सोफिया मोलिनेक्स (4 षटकांत 21 धावा), डेलिसा किम्मिंस (4 षटकांत 17) आणि निकोला कैरी (4 षटकांत 23) हिने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
When you get Harmanpreet Kaur out for 4 ? #T20WorldCup | #FILLTHEMCG
SCORE ? https://t.co/6rmqx18Wfz pic.twitter.com/7RN5Oty91C
— ICC (@ICC) March 8, 2020
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने एलिसा हिलीच्या 39 चेंडूत (7 चौकार आणि 5 षटकार) 75 आणि बेथ मूनीच्या 54 चेंडूत (10 चौकार) नाबाद 78 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 4 बाद 184 धावा केल्या होत्या. याशिवाय मेन लैनिंगने 16(15), एश्ले गार्डनरने 2(3), रेचल हेंसने 4(5), निकोला कैरीने नाबाद 5(5) धावांची खेळी केली.
INNINGS BREAK!
?? have posted a total of 184/4 on the board in the #T20WorldCup final.
Can we make history by chasing this down?Chase coming up shortly. ?? #INDvAUS
LIVE ? https://t.co/oNy9gq275c pic.twitter.com/MFR5hde1Yn
— BCCI Women (@BCCIWomen) March 8, 2020
भारतीय संघाकडून दीप्ती शर्माने 4 षटकांत 38 धावा देत सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर, पूनम यादव (4 षटकांत 30 धावा) आणि राधा यादव (4 षटकात 34 धावा) यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. शिखा पांडे हिने 4 षटकांत 52 तर राजेश्वरी गायकवाडने 4 षटकांत 34 धावा दिल्या. शिखा आणि राजेश्वरी यांना विकेट घेण्यात अपयश आले.