मेलबर्न : बेथ मूनीच्या नाबाद ७१ धावांच्या आणि जेस जोनासेनच्या ५ विकेटच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने बुधवारी अंतिम सामन्यात भारताचा ११ धावांनी पराभव करत महिला तिंरगी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
Beth Mooney (71*) continued her outstanding form, before Jess Jonassen's 5-12 turned the match on it's head for the Aussies!
Catch up on our tri-series final win against India: https://t.co/XygkjF8J5O #CmonAussie pic.twitter.com/TvjWvvyCAR
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) February 12, 2020
आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या १५६ धावांचा पाठलाग करताना भारताला २० षटकांत सर्वबाद १४४ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. त्यामुळे भारताला ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून स्मृति मंधानाने ३७ चेंडूत (१२ चौकार) ६६, रिचा घोषने १७(२३), हरमनप्रीत कौरने १४(१६), तानिया भाटियाने ११(७), दिप्ती शर्माने १०(१४) आणि शेफाली वर्माने १०(९) धावांची खेळी केली. स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर इतर कोणत्याही महिला फलंदाजांला मोठी खेळी करता आली नाही आणि भारताचा डाव १४४ वर आटोपला. आॅस्ट्रेलियाकडून जेस जोनसेनने सर्वाधिक ५ तर तायला वलामिंकने २ तर एलिसे पैरी, मेगान शट आणि अनाबेल सदरलैंड हिने प्रत्येकी १ विकेट घेतली.
AUSSIES WIN THE TRI-SERIES! 💚💛 A Jess Jonassen 5-fa gets us across the line over India ⭐
Scorecard: https://t.co/uuOaJZTc3J #CmonAussie pic.twitter.com/Gvk8qqXmRl
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) February 12, 2020
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने ५४ चेंडूत (९ चौकार) नाबाद ७१,मैन लानिंगने २६(१९), एशले गार्डनरने २६(२४) तर रशेल हैंस हिने १८(७) धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी २ विकेट तर राधा यादव आणि अरूंधति रेड्डीने प्रत्येकी १ विकेट घेतली.