मेलबर्न: अनेक वर्षे क्रिकेट विश्वात निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. भारतीय वंशाच्या खेळाडूंची ऑस्ट्रेलियन संघात याआधीही निवड झाली आहे. मात्र आता टी-२० क्रिकेट संघात निवड झालेला तनवीर संघा याने मोठा संघर्ष केला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियन टीमची निवड करण्यात आली आहे. 9 जुलैपासून या सीरिजला सुरूवात होईल. वेस्ट इंडिज दौऱ्यात ऑस्ट्रेलियन टीम 5 टी-20 आणि 3 वनडे मॅच खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये 19 वर्षीय तनवीर संघा याची निवड करण्यात आली आहे.
The National Selection Panel has chosen the following 23-player preliminary list for the Qantas Australian men’s tour of the West Indies.
Hear more from National Selector, Trevor Hohns and Executive General Manager of National Teams, Ben Oliver: https://t.co/ZGVEHqqiw8 pic.twitter.com/YvaWfSK71w
— Cricket Australia (@CricketAus) May 17, 2021
ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड झालेला तनवीर संघा हा भारतीय मूळ असणारा चौथा खेळाडू आहे. गुरिंदर सिंग संधू हा 2015 साली भारताविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळला होता. संधूचे पालक हे पंजाबी होते. तर स्टुअर्ट क्लार्क आणि ब्रान्सबाय कूपर हे दोघं भारतात जन्मलेले होते, पण तनवीर संघा याचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला.
तनवीर संघा हा भारतीय वंशाच्या टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा आहे. तनवीरचे वडील जोगा सिंग 1997 साली ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. जोगा सिंग हे मूळचे पंजाबच्या जलंधरचे आहे. तनवीरचा जन्म 2001 साली सिडनीमध्ये झाला.
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये तनवीर संघाने 6 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या, यातल्या दोन सामन्यांमध्ये त्याने प्रत्येकी 4-4 विकेट मिळवल्या, तर नायजेरियाविरुद्ध संघाने 14 रन देऊन 5 विकेट घेण्यात यश मिळवलं.