#CWC19 : ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 244 धावांचे लक्ष्य

लंडन – उस्मान ख्वाजा आणि एलेक्स कैरी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 244 धावांचे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंच याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 9 बाद 243 धावांपर्यत मजल मारली आहे.

ऑस्ट्रेलिया संघाची सुरूवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाची 2 बाद 38 अशी अवस्था झाली होती. सलामीवीर डेविड वाँर्नर 16 आणि एराॅन फिंच 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा याने 88 आणि एलेक्स कैरी याने 71 धावा करत ऑस्ट्रेलिया संघास सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

न्यूझीलंडकडून ट्रेटं बोल्ट याने 10 षटकांत 51 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर लॉकी फर्ग्यूसन आणि जिमी नीशम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.