सिडनी – ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने संसदेत आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी महिलेचा माफी मागितली असून यासंबधी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
पीडित महिलेच्या आरोपानुसार, संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात मार्च 2019 मध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. सरकारी पक्षासाठी बलात्कार करणारा आरोपीदेखील काम करतो, असे महिलेने सांगितले आहे. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांना याबाबत महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आपण पोलिसांसोबत याबाबतीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चर्चा केली होती. पण करिअरची चिंता असल्याने कोणतीही तक्रार दाखल केली नाही. एप्रिल 2019 मध्ये पोलिसांनीही तक्रारदार महिलेसोबत संभाषण झाल्याची आणि तिने तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.