मेलबर्न – सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मूनी यांच्या खणखणीत अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आयसीसी टी-20 महिला विश्वचषक
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी 185 धावांचं आव्हान ठेवले आहे.
Australia finish on 184/4
India require the highest ever Women’s #T20WorldCup chase. Can they make history?
SCORE ? https://t.co/fEHpcoaPbC pic.twitter.com/ZtC4OCjpVg
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने एलिसा हिलीच्या 39 चेंडूत (7 चौकार आणि 5 षटकार) 75 आणि बेथ मूनीच्या 54 चेंडूत (10 चौकार) नाबाद 78 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 4 बाद 184 धावा केल्या. याशिवाय मेन लैनिंगने 16(15), एश्ले गार्डनरने 2(3), रेचल हेंसने 4(5), निकोला कैरीने नाबाद 5(5) धावांची खेळी केली.
Healy goes for 75, the highest score in a Women’s #T20WorldCup final.
BIG wicket for India. #T20WorldCup | #FILLTHEMCG
SCORE ? https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/jHUTsCHPJm
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
भारतीय संघाकडून दीप्ती शर्माने 4 षटकांत 38 धावा देत सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर, पूनम यादव (4 षटकांत 30 धावा) आणि राधा यादव (4 षटकात 34 धावा) यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. शिखा पांडे हिने 4 षटकांत 52 तर राजेश्वरी गायकवाडने 4 षटकांत 34 धावा दिल्या. शिखा आणि राजेश्वरी यांना विकेट घेण्यात अपयश आले.