ऑस्ट्रेलियात नाईटक्‍लबबाहेर गोळीबार; 1 ठार कित्येक जखमी

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – एका नाईटक्‍लबबाहेर झालेल्या गोळीबारामध्ये एक जण ठार झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात जखमी झालेल्या एकूण चार जणांना रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत. यापैकी तिघेजण 29 आणि 50 वर्षे वयोगटातील आहेत. तर चौथ्या जखमीचे वय समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. हा गोळीबार दहशतवादाशी संबंधित नसल्याचे पोलिसांच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले आहे.

मेलबर्नचे उपनगर असलेल्या परहरानमध्ये आज (रविवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. मोटरसायकलवरून येऊन गुंडगिरी करणाऱ्या गॅंगचा या गोळीबाराशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू झाला असून दिवसभरात अधिक माहिती मिळण्याची शक्‍यता पोलिसांनी सांगितली.
मेलबर्नमध्ये मार्च महिन्यात झालेल्या अशाच गोळीबाराच्या 4 वेगवेगळ्या घटनेत 5 जण ठार झाले होते. त्यापैकी दोन घटना गॅंगशी संबंधित होत्या.

पोर्ट आर्थरमध्ये एका व्यक्‍तीने 1996 साली 35 जणांना ठार केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये शस्त्रविषयक कडक कायदा लागू झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.