सिडनी – भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचांना उद्देशून अपशब्द वापरल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनी याला आयसीसीने दंड ठोठावला आहे.
सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रकमेचा दंड पेनीला केला आहे. पेनी आयसीसीच्या नियम 2.8 नुसार आचार संहिता भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला.
पेनीने नियमाचा भंग केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय त्याला एक डिमेरिट गुण देण्यात आला असून पुन्हा अशी चूक घडली तर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
तिसऱ्या दिवसाच्या खेळात नाथन लॉयन गोलंदाजी करत असताना चेतेश्वर पुजाराच्या पॅडला लागून चेंडू उडाला आणि तो झेल घेण्यात आला. पुजाराला पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनीने डीआरएस घेतला. त्यातही काही निष्पन्न न झाल्याने पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते. त्यावर संताप व्यक्त करत पेनीने पंचांना उद्देशून अपशब्द वापरले होते.