सिडनी – सर्वाधिक चारवेळा विजेतेपद पटकावणारा आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. मेन लैनिंग सामन्याची मानकरी ठरली. आता विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया संघासमोर रविवारी (8 मार्च) भारतीय संघाचे आव्हान असणार आहे.
AUSTRALIA ARE IN THE WORLD CUP FINAL!
WHAT. A. GAME.#T20WorldCup | #SAvAUS
? ? https://t.co/Oh0sJtwomV pic.twitter.com/Ux9Z5DAKDO
— T20 World Cup (@T20WorldCup) March 5, 2020
यजमान ऑस्ट्रेलियाने गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी पराभव करत आगेकूच केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मेन लैनिंगच्या 49(49), बेथ मूनीच्या 28(24), एलिसा हीलीच्या 18(13) आणि रेचल हेंसच्या 17(18) धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 134 धावा केल्या होत्या. आफ्रिकेकडून गोलंदाजीत नैडीन डी क्लर्कने सर्वाधिक 3 तर नोनकुलुलेको म्लाबा आणि अयाबोन्गा खाका यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
4️⃣9️⃣ crucial runs
2️⃣ vital catches
1️⃣ calm head in the fieldMeg Lanning was sensational for Australia tonight ?#SAvAUS | #T20WorldCup pic.twitter.com/wE79AU837a
— T20 World Cup (@T20WorldCup) March 5, 2020
त्यानंतर दक्षिण आफ्रिका फलंदाजीसाठी मैदानात उतरणार तेच पावसाला सुरूवात झाली आणि सामना उशीरा सुरू झाला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिका संघास 13 षटकांत 98 धावांचे नवीन लक्ष्य मिळाले होते. पण, दक्षिण आफ्रिका संघास 13 षटकांत 5 बाद 92 धावांच काढता आल्या आणि त्यांना 5 धावांनी पराभव पत्करावा लागला.
Heartbreaking for South Africa ?
Unbeaten in the group stage and fighting right to the end. A performance to be proud of ?#SAvAUS | #T20WorldCup pic.twitter.com/mDJKhw9OAM
— T20 World Cup (@T20WorldCup) March 5, 2020
आफ्रिकेकडून फलंदाजीत लौरा वोल्वार्टने नाबाद 41(27) धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास तिला अपयश आले. याशिवाय सुन लुसने 21(22), डेन वैन नीकर्कने 12(12) आणि लिजेल लीने 10(10) धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक 2 तर जेस जोनासेन, सोफिया मोलिनेक्स आणि डेलिसा किम्मिंस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.