सिडनी – ऑस्ट्रेलियाजवळ टास्मानियाच्या पूर्व किनाऱ्यावर तब्बल 230 पायलट व्हेल मृतावस्थेत आढळले आहेत. लांबलचक समुद्रकिनाऱ्यावर अनेक ठिकाणी हे व्हेल मासे विखुरल्याचे विमानातूनही दिसून आले आहे. यापैकी अनेक व्हेल मरण पावले आहेत. तर उर्वरित मरणासन्न अवस्थेत आहेत.
या व्हेलना वाचवण्यासाठी स्थानिक पर्यावरणवाद्यांनी त्यांच्या अंगांवर ब्लॅन्केट टाकली आणि बादल्यांनी या व्हेलच्या अंगांवर पाणी ओतले जाऊ लागले आहे. मात्र जिवंत असलेल्या व्हेल माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होत्या. अनेक व्हेल मरण पावल्या आहेत.
व्हेलना जिवंत ठेवण्यासाठी त्यांना ओढून पाण्यात ढकलण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र ज्या व्हेल मरण पावल्या आहेत त्यांची मृत शरीरे पाण्यातून बाहेर काढण्याचेही प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. मृत व्हेलमुळे या भागात शार्क मासे किनाऱ्याजवळ येऊ नयेत, म्हणून ही खबरदारी घेतली जाऊ लागली आहे.
दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मॅकरी हार्बर जवळ अशाच प्रकारे तब्बल 500 व्हेल आढळल्या होत्या, त्याबैकी 300 व्हेल मरण पावल्या होत्या,उर्वरित व्हेलना वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींनी पुढील अनेक दिवस प्रयत्न केले होते.