मेलबर्न : भारताचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजयी सलामी देत दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. तर अंकिता रैना, रामकुमार रामनाथन यांना पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला आहे.
Indian tennis player Prajnesh Gunneswaran advances to second round of Australian Open qualifiers, Ramkumar and Ankita Raina bow out. #AusOpen
— Press Trust of India (@PTI_News) January 14, 2020
प्रज्ञेशने ऑस्ट्रेलियाच्या हॅरी बाॅर्शिएरचा ६-२, ६-४ असा पराभव करत पुढील फेरीत आगेकूच केली आहे. दुस-या फेरीत प्रज्ञेशसमोर जर्मनीच्या यानिक हांफमैनचे आव्हान असणार आहे.
Prajnesh Gunneswaran in #AO2020 – Singles Qualifiers 🎾
Round 1⃣ bt. H. Bourchier 6-2, 6-4 ✅All the best for the next game against 🇩🇪's Y. Hanfmann 👊😎@AustralianOpen @PrajneshGP #Tennis pic.twitter.com/nUac3d0FmA
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) January 14, 2020
रामकुमार रामनाथनचा अर्जेंटिनाच्या फ्रेडरिको कोरिओने ४-६, ६-४, ६-१ असा पराभव केला. तर महिला एकेरीच्या पात्रता फेरीमध्ये बल्गेरियाच्या व्हिक्टोरिया तोमोवाने अंकिता रैनाचा ६-२, ७-६(२) असा पराभव केला.