AUS vs PAK 1st ODI : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 4 नोव्हेंबरला मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. कर्णधार पॅट कमिन्स संघात पुनरागमन करत आहे. 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात परतत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क हे सलामीवीर म्हणून दिसणार आहेत. जेक फ्रेझर-मॅकगर्कने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.डेव्हिड वॉर्नरचा पर्याय म्हणून ऑस्ट्रेलियन संघ त्याच्याकडे पाहत आहे. मॅथ्यू शॉर्टनेही आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
मधल्या फळीची कमान स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांच्याकडे असेल. जोश इंग्लिस यष्टिरक्षक-फलंदाजच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल आणि ॲरॉन हार्डी या दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या फिनिशिंग कौशल्यासाठी ओळखले जातात.गोलंदाजी आक्रमणाची कमान कमिन्सकडे असेल. त्याला शॉन ॲबॉट आणि अनुभवी मिचेल स्टार्क यांची साथ मिळेल. याशिवाय ॲडम झाम्पाही संघात असेल.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे :- पॅट कमिन्स (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा.