अॅडलेड – ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने 73 वर्षांपू्र्वीचा जुना रेकॉर्ड मोडला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम आता स्मिथच्या नावावर झाला आहे.
We are witnessing greatness!
Steve Smith becomes the fastest player to reach 7000 Test runs.
? AAP#AUSvPAK #Cricket pic.twitter.com/rWTkPoxSY4
— ABC Grandstand (@abcgrandstand) November 30, 2019
दरम्यान, अॅडलेडच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, यजमान ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या द्विशतकी खेळीसोबत स्टिव्ह स्मिथनेही दुसऱ्या दिवसाच्या खेळात अनोखा विक्रम त्याच्या नावावर केला आहे. स्टिव्ह स्मिथने ७० कसोटी सामन्यात १२६ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली. याआधी १९४६ साली इंग्लंडच्या वेली हॅमाँड यांनी १३१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.