AUS vs ENG – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात कांगारूंनी दमदार फलंदाजी करत विजय मिळवला होता. त्यांनतर आता शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात (AUS vs ENG) ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडचा 72 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून 280 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ 38.5 षटकांत 208 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
#VijayHazareTrophy । CSK संघाने बाहेर काढले अन् पठ्ठ्याने ठोकले ४ सामन्यात ४ शतकं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. डेव्हिड वॉर्नर 16 धावा करून बाद झाल्याने संघाला 33 च्या धावसंख्येवर पहिला धक्का बसला. यानंतर ट्रॅव्हिस हेडही 19 धावा करून बाद झाला. येथून पुढे स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन यांनी दमदार फलंदाजी करत 101 धावांची भागीदारी केली. लबुशेन अर्धशतक पूर्ण करत 58 धावा करून बाद झाला. अॅलेक्स कॅरीला खातेही उघडता आले नाही. स्टीव्ह स्मिथ शतकाच्या अत्यंत जवळ असताना 94 धावांवर बाद झाला. खालच्या फळीत मिचेल मार्शने धडाकेबाज खेळ दाखवत 50 धावा केल्या आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून आदिल रशीदने 57 धावा खर्च करत तीन फलंदाजांना बाद केले.
#VijayHazareTrophy । CSK संघाने बाहेर काढले अन् पठ्ठ्याने ठोकले ४ सामन्यात ४ शतकं
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. कारण इंग्लंड संघाने शून्य धावसंख्येवरच दोन गडी गमावले होते. जेसन रॉय आणि पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या डेव्हिड मलानला पहिल्याच षटकातच मिचेल स्टार्कने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फिल सॉल्ट झटपट फलंदाजी करताना 23 धावा करून बाद झाला. यानंतर जेम्स विन्स आणि सॅम बिलिंग्जने डावाला सांभाळत शतकी भागीदारी केली. विन्स 60 धावा करून बाद झाला. तर बिलिंग्सने ७१ धावांची खेळी केली. यानंतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्क आणि अॅडम झम्पाने प्रत्येकी चार गडी बॅड केले.