मेलबर्न : माजी विजेती सेरेना विल्यम्स हिला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या तिस-या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे सेरेनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या तिस-या फेरीच्या लढतीत चीनच्या २७ व्या मानांकित कियांग वांगने आठव्या मानांकित सेरेना विल्यम्सवर ४-६, ७-६ (७-२), ५-७ अशी मात केली. तब्बल २ तास ४० मिनिटे चाललेल्या या सामन्यात कियांग वांगने सेरेनाची झुंज मोडून काढत सनसनाटी विजय नोंदवला.
The moment of a LIFETIME!
Qiang Wang puts on an absolute masterclass in the match of the tournament to shock Serena Williams 6-4 6-7(2) 7-5 and advance to a first career #AusOpen round of 16.#AO2020 pic.twitter.com/gnGkAMaU8X
— #AusOpen (@AustralianOpen) January 24, 2020
या पराभवामुळे सेरेनाची एकेरीतील विक्रमी २४ ग्रँड स्लम जेतेपदाच्या बरोबरीची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. दरम्यान, चौथ्या फेरीत वांगसमोर ट्युनिशीआच्या ओन्स जाबेअरचे आव्हान असणार आहे.