मेलबर्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अनुभवी टेनिसपटू मारिया शारपोवाला पहिल्याच गाशा गुंडाळावा लागला आहे. पाच वेळची ग्रँडस्लम विजेती शारापोवा हिची आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही आॅस्ट्रेलियन ओपनमधील सुमार कामगिरी ठरली आहे.
जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वलस्थानी असलेल्या मारिया शारापोवाचा क्रोएशियाच्या डोना व्हेकिचने सलामीच्या लढतीत ६-३, ६-४ असा पराभव केला.
Picking up where she left off ➡️
Donna Vekic, a 2019 US Open quarterfinalist, advances with a R1 win over former champion Maria Sharapova.#AusOpen pic.twitter.com/ujrUUvhiO7
— US Open Tennis (@usopen) January 21, 2020
खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या मारिया शारापोवाला वाइल्ड कार्डने प्रवेश देण्यात आला होता, मात्र तिचे स्पर्धेतील पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आलं आहे.