तलवारबाजीत औरंगाबादचे यश

लातूर: राज्यस्तरीय आंतर शालेय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबाद विभाग संघाने तब्बल 35 पदके जिंकत विजेतेपद पटकावले. मुंबई विभागाने उपविजेतेपद तर यजमान लातूर विभागाला तिसरे स्थान मिळाले. औरंगाबाद संघाने अकरा सुवर्ण, 8 रजत व 16 ब्रॉंझ अशी तब्बल 35 पदकांची कमाई केली. मुंबई विभागाने 10 सुवर्ण, 8 रजत व 11 ब्रॉंझपदके जिंकली. यजमान लातूर विभागाने 5 सुवर्ण, 1 रजत व 8 ब्रॉंझपदके पटकावली.

वैयक्तिक प्रकारामध्ये 14 वर्षांखालील गटात यश वाघ, हर्षवर्धन औताडे, कृष्णा मगर, रोहन शहा, तेजस पाटील, हर्षदा वंजारे, गार्गी डोंगरे, नचिकेत विधाते, निखिल वाघ, आदित्य वाहुळ, प्रणव महारनवर यांनी पदके जिंकली. 17 वर्षांखालील गटात स्नेहल पाटील, कशिष भराड, वैदेही लोहिया, अब्रोक्रांती वडनेर, महेश कोरडे, अभिषेक देशमुख, अभय शिंदे, प्रथमेश तुपे, जयदीप पांढरे, प्रीतम देशमुख, विशाखा काजळे, प्रीती टेकले यांनी पदकांची कमाई केली.

सांघिक प्रकारांत 14 वर्षांखालील गटात रोहन शहा, तेजस पाटील, नरेश वंजारे, आदित्य चव्हाण, हर्षवर्धन औताडे, कृष्णा मगर, मयूर ढसाळ, ओम मुगल, भक्ती मस्के, कनक परदेशी, ममता काथार, मयुरी धनेधर, हर्षदा वंजारे, गार्गी डोंगरे, अक्षदा भवरे, मैत्री तेलवडे यांनी आपापल्या प्रकारांत पदके जिंकली. 17 वर्षांखालील गटात सोहम कुलकर्णी, प्रणव महारनवर, वेदांत खैरनार, निखिल वाघ, पियुष उंडाळे, आदित्य वाहुळ, वैदेही लोहिया, अब्रोक्रांती वडनेरे, योगिनी देशमुख, वैदेही जोशी, कशिष भराड, अपूर्वा रसाळ, हिमांशी संकमवाड, तन्वी जाधव यांनी पदकांची कमाई केली.

19 वर्षांखालील गटात जयदीप पांढरे, सर्वेश मिसाळ, प्रीतम देशमुख, चैतन्य शेंडे, प्रशिक साळवे, बलवंत पोफळे, मोहित राठोड, अभिषेक जाधव, विशाखा काजळे, प्रीती टेकले, पलक अरोरा, धनश्री पेंढारे, जानकी डोंबे, प्राची मगर, श्रुतिका शेजवळ, कोमल इंगळे यांनी आपापल्या प्रकारांत पदके जिंकली.

Leave A Reply

Your email address will not be published.