औरंगाबादचं संभाजीनगर होणारच

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.अशातच आता  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की’ त्यांच्या  या विधानामुळे  महाविकासआघाडीत पुन्हा  कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, औरंगाबादचे नामकरण “संभाजीनगर’ असे करण्याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याने आणि त्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाल्याने नामांतराच्या या विषयावरून मतांतरे दिसू लागली आहेत. मात्र  याबाबतही  महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं सांगितलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.