पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी वाढ

कोल्हापूर – ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील औरंगाबादच्या केसापुरी चा नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर याच्या पोलीस कोठडीची 24 जून पर्यंत वाढ केलीय. कळसकरच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने कोल्हापूर SIT ने आज  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचे समोर हजर केले असता त्यास 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी वाढकळसकरचा पानसरे हत्येमध्ये महत्वाचा सहभाग…

Posted by Dainik Prabhat on Tuesday, 18 June 2019

कळसकर याच्याकडून गेल्या सात दिवसांमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे त्याला आणखी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनंती तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे आणि विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी केली न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करत कळसकरच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ केली आहे.

यावेळी पोलिसांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे-

1) कळसकरचा पानसरे हत्येमध्ये महत्वाचा सहभाग

2) मोबाईल व डायरीचा शोध घ्यायचा आहे. त्याने हा पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिले आहे

3) महाराष्ट्राच्या बाहेरील एका मोठ्या शहरात तपासाठी त्याला घेऊन जायचे आहे.

4) पिस्तुल बनवून ते कोल्हापूरात घेऊन कळसकर आला होता.

5) पिस्तुलाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती.

6) पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण त्याने इतर साथीदारांसोबत बेळगावमध्ये घेतले.

या युक्तिवादानंतर न्यायालयाने शरद कळसकर याच्या पोलिस कोठडीत 24 जून पर्यंत वाढ केली आहे तसेच या दरम्यान होणाऱ्या तपासातील प्रगती बाबतचा अहवाल देखील न्यायालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)